पोस्ट्स

मार्च, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
इमेज
हेच का फळ मम  तपाला !.....  इरोम चानू शर्मिला .. भारताचे वादळी व्यक्तिमत्व !... ईशान्य भारतातील मणिपूर मधील सामाजिक कार्यकर्त्या. .. कोंगपाल, इंफाळ (मणिपूर) येथील रहिवासी ... सैन्याला दिलेला विशेष कायदा (आर्म्स फोर्स स्पेशल अक्ट ) १९५८ रद्द  व्हावा म्हणून तब्ब्ल १६ वर्ष (कालावधी -- ४ नोव्हेंबर  २००० ते ९ ऑगस्ट २०१६) उपोषण करणाऱ्या व नुकत्याच मणिपूरमधील निवडणुकीत फक्त ९० मते मिळवून चर्चेत आलेल्या ..   ४४ वर्षीय इरोम चानू शर्मिला यांना मिळालेली ९० मते म्हणजे आपली लोकशाही अजूनही बाल्यावस्थेत असल्याचे संकेत आहेत.   लोकशाहीत लोक गुंडा ला एकवेळ साथ  देतील पण आपल्यासाठी लढा देणाऱ्याला एवढं लोळतील हे मणिपुरी जनतेकडून होणं म्हणजे ... " हेच का फळ मम तपाला " असे खेदाने म्हणावे लागेल. व्यक्तीश: विचाराल तर सैन्याला दिलेल्या या विशेष अधिकारामागे दहशतवाद्याचे शिरकाण करणे हा उद्देश असल्याने इरोमची बाजू घेता येणार नाही. पण मानवतेने विचार करता व तिच्या  अहिंसक  आंदोलनाकडे पाहता एक स्पष्ट मध्यवर्ती तोडगा निघणे अपेक्षित होते.