पोस्ट्स

ऑगस्ट, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धरतीचा स्वर्ग --- " सोनमर्ग "

इमेज
' सोनमर्ग ' ला रात्री ११ वाजता पोहोचलो. ' इंटरनेट ' वरून बुकिंग केले असल्याने निर्धास्त होतो. दहशतवादाचे  सावट असल्याने निर्जन स्थळी रहावेसे वाटत नव्हते. शेवटी निसर्ग खुणावत होता … खरंचच धरतीचा स्वर्ग 'सोनमर्ग' आहे 

जम्मू ते सोनमर्ग व्हाया श्रीनगर प्रवास .........

इमेज
जम्मू त ' झायालो ' ठरवली.    खरे  तर ' तवेरा ' मनात होती. पण दुधाची तहान ताकावर !..  असे म्हणून   ' झायालो ' वर समाधान मानले. वळणावळणाच्या रस्त्याने गाडी निघाली. एवढा खतरनाक रस्ता मी उभ्या जन्मात पाहिला नाही.                                                ' काझीगुंड ' येथे खरेदी केलेली हि टोपी

' जम्मू ' त दाखल … ८ जुलै २०१३

इमेज
राजधानी एक्प्रेस आपल्या लौकिकाला जागली नाही . तब्बल १ तास लेट झाली. व जम्मू येताच अर्धा तास रेंगाळली. बाहेर एव्हाना पाऊस सुरु झाला होता. ८ जुलै २०१३ …. पहाटे  पोहोचण्याचे नियोजन होते पण आता ७ वाजत आले होते. एवढे होऊनही राजधानी बरोबर फोटो काढल्याशिवाय राहवले नाही.

दिल्ली दर्शन

इमेज
दि. ७ जुलै २०१३ सकाळी १० वाजता आम्ही दिल्ली - निजामुद्दीन स्टेशनवर पोहोचलो. वेळ भरपूर होता  रात्री ८ वाजता जम्मू राजधानी एक्प्रेस ने निघावयाचे होते म्हणून दिल्ली-दर्शन चा आनंद लुटला.    कुतुबमिनार, दिल्ली गेट , लोटस टेंपल, लाल किल्ला हि स्थळे पाहिली   पर्यटनाचा आनंद लुटत असताना आलेला एक बाका प्रसंग येथे नोंदवावा असे वाटते..  आम्ही जी चार-चाकी ठरविली होती. तिचा 'ड्राव्हवर कम वाहनचालक' फारच अवलादी असामी होता..  चार-चाकी अशी दामटीत होता,  पूर्वी बहुतेक विमानच चालवीत असावा -----  'अस्मादिक' !..    पण एका टप्प्यावर प्रामाणिक दिल्ली पोलिसांनी गाडी अडविली. वाहनचालकाला फैलावर घेतले. मग मोर्चा आमच्याकडे वळविला. जोरात विचारले, " कहां के  है, आप, दिल्ली दर्शन कि रिसीट तो निकाली है ना ? " ….  वाचकांना हे जरूर नमूद करतो. दिल्ली त घेलात व पर्यटन करण्याची इच्छा झालीत तर तर दिल्ली दर्शन ची पावती काढावी लागते. शक्यतो प्रवास '  दिल्ली दर्शन   बस ' ने करावा … ती '  दिल्ली दर्शन ' बस सगळे  स्थळ दाखविते.   पैसे वाचविण्याच्या नादात अनोळखी प्रांतात फसग

अमरनाथ यात्रा सुरुवात २०१३

इमेज
दि. ६ जुलै २०१३ आमच्या  अमरनाथ यात्रेची सुरुवात झाली. सोडायला घरचे सर्व आले होते. अमरनाथ  यात्रेला चाललो होतो ना ?????… मागच्या वेळेसारखे झेलम ने जायचे नव्हते….  खूपच वेळ खाऊ एक्सप्रेस … त्यापेक्षा मुंबई वरून दिल्ली व तेथून जम्मू असा कार्यक्रम होता …. असे आम्ही पाच जन   निघालो  …. मी- विजयकुमार भवारी, प्रमोद बांबळे, वैभव  बांबळे, गणेश कर्पे, सोमनाथ सोमवंशी ....वेडात मराठे वीर दौडले पाच.............. वाटेत लोणावळ्याला  पाऊस धारा सुरु झाल्या…. वाटलं  !। पाऊस पूर्ण ट्रीप भर धिंगाणा घालतोय.. पण ..  तसे झाले नाही … आम्ही जस- जसे पुढे जात होतो … तस - तसे पावसाचे शुक्ल-काष्ठ आमच्या पाठीशी राहिले नाही .. ते एक बरेच झाले...  मुंबईत 'बांद-या'ला   गरीब रथ ची  खूपच वाट पहावी लागली, त्यात सगळ्या प्लेटफ़ोर्म भर कन्याच-कन्या !… बहुतेक दिल्लीला युवा स्पर्धेला चालल्या होत्या. पण काय त्यांचा सगळीकडे चिव-चिवचिवाट चालला होता.  एकदाचे आम्ही ' गरीबरथ ' एक्सप्रेस  मध्ये स्थानापन्न झालो. AC त असलेली गरिबासाठी ची हि रेल्वे ….  मध्यमवर्गीयात खूपच लोकप्रिय !!…