दि. ७ जुलै २०१३ सकाळी १० वाजता आम्ही दिल्ली - निजामुद्दीन स्टेशनवर पोहोचलो. वेळ भरपूर होता रात्री ८ वाजता जम्मू राजधानी एक्प्रेस ने निघावयाचे होते म्हणून दिल्ली-दर्शन चा आनंद लुटला. कुतुबमिनार, दिल्ली गेट , लोटस टेंपल, लाल किल्ला हि स्थळे पाहिली पर्यटनाचा आनंद लुटत असताना आलेला एक बाका प्रसंग येथे नोंदवावा असे वाटते.. आम्ही जी चार-चाकी ठरविली होती. तिचा 'ड्राव्हवर कम वाहनचालक' फारच अवलादी असामी होता.. चार-चाकी अशी दामटीत होता, पूर्वी बहुतेक विमानच चालवीत असावा ----- 'अस्मादिक' !.. पण एका टप्प्यावर प्रामाणिक दिल्ली पोलिसांनी गाडी अडविली. वाहनचालकाला फैलावर घेतले. मग मोर्चा आमच्याकडे वळविला. जोरात विचारले, " कहां के है, आप, दिल्ली दर्शन कि रिसीट तो निकाली है ना ? " …. वाचकांना हे जरूर नमूद करतो. दिल्ली त घेलात व पर्यटन करण्याची इच्छा झालीत तर तर दिल्ली दर्शन ची पावती काढावी लागते. शक्यतो प्रवास ' दिल्ली दर्शन बस ' ने करावा … ती ' दिल्ली दर्शन ' बस सगळे स्थळ दाखविते. पैसे वाचविण्याच्या नादात अनोळखी प्रांतात फसग