पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
ईशान्य भारत .... आजही रडतोय .. भारतीय स्वातंत्र्यानंतर ईशान्य भारताकडे कमालीचे दुर्लक्ष झालेय   नागालँड, मिझोराम, मेघालय ,  त्रिपुरा, मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम हे ईशान्य भारतीय प्रदेश भारताचे भूभाग म्हणून आज दिमाखात उभे आहेत पण आपण भारतीय ईशान्य भारतीयांना आपले मानतो का ? .... याचे उत्तर हो असेल तर आपली जबबादारी वाढतेय ... या  प्रदेशाला विकसित करण्याची जबाबदारी उर्वरित भारताची आहे   आज हा प्रदेश, जो पूर्वी आसाम राज्याचा भाग समजला जात असे, अशांत आहे. दहशतवाद, मूलतत्त्ववाद, अस्मिता असे अनेक प्रश्न त्यात गुंतले आहेत. परंतु मूळ प्रश्न हा विकासाचा आहे. आधीच विकास कमी झालेला, त्यातून जो काही झाला त्याची फळे स्थानिक मंडळींच्या पदरात न पडता परप्रांतियांच्या उदरात पोचली. तत्कालिन पूर्व पाकिस्तान (आता बांगलादेश) इथून लोकसंख्येच्या रेटयामुळे स्थलांतर होत राहिले आणि राजकारणी मंडळींनी मतपेटीकडे नजर ठेवत कधी दुर्लक्ष; तर कधी छुपा पाठिंबा असा मार्ग अनुसरला. एक चटकन लक्षात न येणारा भाग म्हणजे भारताच्या फाळणीमुळे या सर्व भागाचा समुद्राशी संपर्क तुटला. पाकिस्ताननिर्मितीआधी चितागॉंग बंदर

WISDEN

इमेज
विस्डेन  वर विराट ....  क्रिकेटचे  बायबल समजले जाणारे ' विस्डेन क्रिकेटर्स अल्मनाक ' उर्फ विस्डेन  हे वार्षिक अनेक बाबतीत महत्वपूर्ण मानले जाते. विस्डेन इंग्लंड मधून प्रकाशित होते. यंदाच्या वर्षी एप्रिल मध्ये  या वार्षिकातील मुखपृष्ठावर विराट कोहली असणार आहे. हे वार्षिक ६ एप्रिल ला प्रसिद्ध होईल.  एरवी क्रिकेटच्या पुस्तकातील कोणताही फटका हुकमी मारणाऱ्या विराट कोहलीच्या ' रिव्हर्स स्वीप ' ला विस्डेन ने प्राधान्य दिले आहे.  या  छायाचित्रातून विराटच्या लढाऊ व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते असे विस्डेन चे संपादक लॉरेन बुथ यांनी म्हटले आहे.  विस्डेन ने नेहमीच तंत्रशुद्ध क्रिकेटला आणि  तंत्रशुद्ध खेळाडुंना पाठिंबा दिला आहे परंतु क्रिकेटचे बदलते  स्वरूप पाहता विराट कोहली सारख्या क्रिकेटमध्ये क्रांती  घडवून आणणाऱ्या  खेळाडूला मुखपृष्ठावर स्थान  देण्याची  हीच  यॊग्य  वेळ आहे. असेही बूथ यांनी म्हटले आहे .    गेल्या ४ वर्षांचा विचार करता सचिन नंतर विस्डेन च्या मुखपृष्ठावर झळकणारा विराट हा दुसरा भारतीय आहे.  ही  तमाम क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.  विराटच्या दृष्टीने  त्याच्या क