प्राजक्त आणि मी
प्राजक्ताची फूले बहरली
आणि मी ...
कोमेजलो...
तो बहरत होता. .
मी निराश होत होतो...
खरे तर त्याच्या बहरण्यामुळे
उत्साह द्विगुणित व्हायला,
पाहिजे होता...
पण मी निराशेच्या गर्तेत,
आशेच्या हिंदोळ्यांवर
फक्त मागे मागे जात होतो
तो प्राजक्त, त्याचे अस्तित्व,
मला ठायी...ठायी. ..
संचिताची सय करून,
देत होती...
प्रा.विजयकुमार विनायक भवारी
वारजे (पुणे)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा