अमरनाथ यात्रा सुरुवात २०१३
दि. ६ जुलै २०१३ आमच्या अमरनाथ यात्रेची सुरुवात झाली. सोडायला घरचे सर्व आले होते. अमरनाथ यात्रेला चाललो होतो ना ?????… मागच्या वेळेसारखे झेलम ने जायचे नव्हते…. खूपच वेळ खाऊ एक्सप्रेस … त्यापेक्षा मुंबई वरून दिल्ली व तेथून जम्मू असा कार्यक्रम होता …. असे आम्ही पाच जन निघालो …. मी- विजयकुमार भवारी, प्रमोद बांबळे, वैभव बांबळे, गणेश कर्पे, सोमनाथ सोमवंशी ....वेडात मराठे वीर दौडले पाच..............
वाटेत लोणावळ्याला पाऊस धारा सुरु झाल्या…. वाटलं !। पाऊस पूर्ण ट्रीप भर धिंगाणा घालतोय.. पण .. तसे झाले नाही … आम्ही जस- जसे पुढे जात होतो … तस - तसे पावसाचे शुक्ल-काष्ठ आमच्या पाठीशी राहिले नाही .. ते एक बरेच झाले... मुंबईत 'बांद-या'ला गरीब रथ ची खूपच वाट पहावी लागली, त्यात सगळ्या प्लेटफ़ोर्म भर कन्याच-कन्या !… बहुतेक दिल्लीला युवा स्पर्धेला चालल्या होत्या. पण काय त्यांचा सगळीकडे चिव-चिवचिवाट चालला होता. एकदाचे आम्ही ' गरीबरथ ' एक्सप्रेस मध्ये स्थानापन्न झालो. AC त असलेली गरिबासाठी ची हि रेल्वे …. मध्यमवर्गीयात खूपच लोकप्रिय !!…
va farach chan !...
उत्तर द्याहटवाChhan sir... keep posting
उत्तर द्याहटवाthank U !...
उत्तर द्याहटवा