ईशान्य भारत .... आजही रडतोय ..
भारतीय स्वातंत्र्यानंतर ईशान्य भारताकडे कमालीचे दुर्लक्ष झालेय नागालँड, मिझोराम, मेघालय , त्रिपुरा, मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम हे ईशान्य भारतीय प्रदेश भारताचे भूभाग म्हणून आज दिमाखात उभे आहेत पण आपण भारतीय ईशान्य भारतीयांना आपले मानतो का ? .... याचे उत्तर हो असेल तर आपली जबबादारी वाढतेय ... या प्रदेशाला विकसित करण्याची जबाबदारी उर्वरित भारताची आहे आज हा प्रदेश, जो पूर्वी आसाम राज्याचा भाग समजला जात असे, अशांत आहे. दहशतवाद, मूलतत्त्ववाद, अस्मिता असे अनेक प्रश्न त्यात गुंतले आहेत. परंतु मूळ प्रश्न हा विकासाचा आहे. आधीच विकास कमी झालेला, त्यातून जो काही झाला त्याची फळे स्थानिक मंडळींच्या पदरात न पडता परप्रांतियांच्या उदरात पोचली. तत्कालिन पूर्व पाकिस्तान (आता बांगलादेश) इथून लोकसंख्येच्या रेटयामुळे स्थलांतर होत राहिले आणि राजकारणी मंडळींनी मतपेटीकडे नजर ठेवत कधी दुर्लक्ष; तर कधी छुपा पाठिंबा असा मार्ग अनुसरला. एक चटकन लक्षात न येणारा भाग म्हणजे भारताच्या फाळणीमुळे या सर्व भागाचा समुद्राशी संपर्क तुटला. पाकिस्ताननिर्मितीआधी चितागॉंग बंदर, इतर लहान खाडया या मार्गे इथल्या मालाला समुद्रमार्गे ने-आण करायला वाव होता. पण नंतर तो बंद झाला. ही बाब एका बाजूला; तर दुसरीकडे स्वतंत्र भारताबरोबर हा व्यापार वळवणे हे महागडे, तसेच रस्ते नसल्याने काही बाबतीत अशक्य; अशा रेटयामुळे आधीच फार मर्यादित असलेली आर्थिक व्यवस्था कोलमडली.

वास्तववादी विचार
उत्तर द्याहटवा