WISDEN

विस्डेन  वर विराट .... 

क्रिकेटचे  बायबल समजले जाणारे ' विस्डेन क्रिकेटर्स अल्मनाक ' उर्फ विस्डेन  हे वार्षिक अनेक बाबतीत महत्वपूर्ण मानले जाते. विस्डेन इंग्लंड मधून प्रकाशित होते. यंदाच्या वर्षी एप्रिल मध्ये  या वार्षिकातील मुखपृष्ठावर विराट कोहली असणार आहे. हे वार्षिक ६ एप्रिल ला प्रसिद्ध होईल.  एरवी क्रिकेटच्या पुस्तकातील कोणताही फटका हुकमी मारणाऱ्या विराट कोहलीच्या ' रिव्हर्स स्वीप ' ला विस्डेन ने प्राधान्य दिले आहे.  या  छायाचित्रातून विराटच्या लढाऊ व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते असे विस्डेन चे संपादक लॉरेन बुथ यांनी म्हटले आहे.  विस्डेन ने नेहमीच तंत्रशुद्ध क्रिकेटला आणि तंत्रशुद्ध खेळाडुंना पाठिंबा दिला आहे परंतु क्रिकेटचे बदलते  स्वरूप पाहता विराट कोहली सारख्या क्रिकेटमध्ये क्रांती  घडवून आणणाऱ्या  खेळाडूला मुखपृष्ठावर स्थान  देण्याची  हीच  यॊग्य  वेळ आहे. असेही बूथ यांनी म्हटले आहे  गेल्या ४ वर्षांचा विचार करता सचिन नंतर विस्डेन च्या मुखपृष्ठावर झळकणारा विराट हा दुसरा भारतीय आहे.  ही  तमाम क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.  विराटच्या दृष्टीने  त्याच्या क्रिकेट  कारकिर्दीला गोऱ्या साहेबाने केलेला सलाम आहे.      १८६४ मध्ये  इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जॉन विस्डेन यांनी विस्डेन हे वार्षिक  फ्रेड लिलिव्हाइट याच्या द गाईड टू  क्रिकेटर्स या नियतकालिकाला टक्कर देण्यासाठी सुरु केले.  तसे पाहिले तर इंग्लिश क्रिकेटला वाहिलेले विस्डेन संकुचित देशीय क्रिकेट-वार्षिक आहे.  त्याचे इतके कौतुक का ? ... कारण तसा  प्रयत्न करणारे ते एकमेव, निरपेक्ष, मान्यताप्राप्त वार्षिक आहे.

यंदाच्या एप्रिल मधील विस्डेन चे मुखपृष्ठ 






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासींचे सुरक्षा कवच : भारतीय संविधान तरतुदी : विजयकुमार भवारी