मस्तानी तलावाकडे माझी आणि राजू ची मुशाफिरी १६. ११. २०१४
मस्तानी तलावाकडे माझी आणि राजू ची मुशाफिरी १६. ११. २०१४
आजचा दिवस रविवार ……. म्हटलं कोठे जावं तर राजू उर्फ महेश भागवत उत्तरले … दिवेघाट जवळचा "मस्तानी तलाव " !!………… ………जे ना देखे रवि ते देखे राजू असे म्हणा हव तर ? राजू मी great treker म्हणतो ते उगीच नाही
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता मस्तानी तलावा बाबत बोलूया !!………………
मराठी धुरंधर वीर पहिला बाजीराव पेशवा ची पत्नी मस्तानी ( मात्र अजूनही मस्तानीची ओळख बाजीरावाची रखेल अशीच केली जाते ) च्या नावाने दिवे घाटाच्या नजीक वडकी गावा नजीक चा तलाव . आता परत प्रतिप्रश्न पडेल मस्तानी बद्दलचा इतिहास.
मस्तानी ही बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याची संतती होती. त्यांना समशेर बहादुर नावाचा मुलगा होता.ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, मीरा, मस्ताना, केशवदास तुलसीदास हे संत तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिचा अभ्यास होता. मस्तानी एक बुंदेल स्त्री, जी बाजीराव पेशवे यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने हे जग सोडून गेली. भारतीय इतिहासात बऱ्याच प्रेमकहाण्या प्रसिद्ध आहेत. ढोला-मारू, दलपतराय-दुर्गावती, रझिया सुलताना-याकुत, जोधा-अकबर, सलीम-अनारकली व बाजीराव-मस्तानी. त्यात ऐतिहासिकता किती हा भाग वेगळा. पण या युगलांचे प्रेम सर्वाधिक कौतुकास पात्र होऊन हिंदुस्थानी अंत:करणात चिरंतन स्थान मिळवून आहे हे खरे. वरील सर्व प्रेमकथांमध्ये एक समान सूत्र आढळते. प्रेम करण्याचे निसर्गदत्त स्वातंत्र्य विरुद्ध प्रस्थापित समाज व्यवस्था असा संघर्ष! मात्र बाजीराव-मस्तानीची कहाणी अनेक कारणामुळे त्यात वेगळी व अद्वितीय ठरते. १७३० मध्ये मस्तानी पुण्यास आली तेव्हा १७ वर्षांची होती व बाजीराव तिशीतला. तिचे स्वागत कसे झाले हे कळत नाही. पण बाजीरावाने शनिवारवाडय़ाजवळ तिच्यासाठी स्वतंत्र हवेली बांधली तेव्हापासून तक्रारी सुरू झाल्या असाव्यात. पुढे शनिवारवाडय़ाभोवती कोट उभारला गेला. तेव्हा मस्तानी महल आत आला. आज या वास्तूचे अवशेष शिल्लक नाहीत. १८१२ साली दुसऱ्या बाजीरावाने ती जागा खणून काढली व तेथे झाडे लावली. म्हणून म्युझियममध्ये मस्तानी महाल म्हणून जो सज्जा दाखविला जातो तो मूळ वास्तूचा नाही. तिच्या चित्रांबद्दलही हीच अवस्था आहे. मस्तानी एक घरंदाज, पडदानशीन स्त्री होती. ती कोणाच्या दृष्टीस पडेल हे शक्य नव्हते. म्हणून तिचे चित्र काढले जाणे अशक्य होते. आज दोन चित्रे मस्तानीची म्हणून मानली जातात ती अस्सल नाही, असे जाणकारांचे मत आहे. मस्तानीला नृत्यकला अवगत होती, पण ती राजघराण्यातील मुलींच्या शिक्षणाचा एक भाग म्हणून. पेशव्यांकडील गोकुळ अष्टमीच्या उत्सवात कृष्णाला मानणाऱ्या प्रमाणी पंथाच्या या मुलीने नृत्य केले असले म्हणून ती नृत्यांगना ठरत नाही. १७३४ साली मस्तानीला मुलगा झाला. त्याची दोन नावे ठेवली गेली. समशेर बहादूर व कृष्णसिंग, एक मुसलमानी परंपरेतील, दुसरे हिंदू. यात मातापित्यांचा उदार दृष्टिकोन दिसून येतो. कृष्णसिंगाची मुंज व्हावी असा आग्रह बाजीरावाने धरला होता. त्याला घरच्यांनी व पुण्यातील ब्राह्मणांनी विरोध केला यात आश्चर्य नाही. बाजीरावाचा हा पुत्र गादीच्या वारसासाठी समस्या उभी करील, अशीही भीती मस्तानीविरोधामागे असावी. त्याच्या बाजूने विचार करता ही भीती अनाठायी होती, असे म्हणता येणार नाही. असे असले तरी मस्तानीला पाबळ येथे स्वतंत्र जहागिरी देण्यात आली होती. याचा अर्थ तिला मान्यता मिळाली होती.





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा